ग्रामविकास अधिकारी बि.के. पारधी यांचा मारुळ येथे पार पडला सत्कारपर कार्यक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | यावल तालुक्यातील मारुळ येथील जळगाव जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी आज १६ मार्च रोजी ता. यावल येथील ग्रामविकास अधिकारी यांची निवड करण्यात आली.

यावल येथील ग्रामविकास अधिकारी बि.के. पारधी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय मारुळ येथे त्यांचे सत्कारपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुळ गावचे सरपंच असद सैय्यद होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद जळगावचे गटनेते जि. प. सदस्य तथा भारतीय कॉग्रेस’चे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, संजय गांधी समितीचे सदस्य जावेद अली सैय्यद, मल्टी परपज सह. सोसायटीचे चेअरमन जियाउलहक सैय्यद, उपसरपंच पती सलामत अली सैय्यद हे होते.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी बि के पारधी यांचा शाल व गुच्छ देऊन सन्मानित करून सत्कार करण्यात आला. जळगाव शहरातील यावल ग्रामरोजगार सेवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळू तायडे, मतिउर रहेमान पिरजादे, कबीर उद्दीन फारुकी ख्खाजा मोईनुद्दीन युवराज इंगळे, संतोष तायडे, संजय तायडे, कारकुन परवेझ सैय्यद व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like