चोपड्यात दोन दुचाकी चोरट्याना अटक ; एलसीबीची कारवाई
खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ |स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपड्यात दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. गणेश ऊर्फ घनशा शिलदार बारेला (२४, रा. कर्जाणा, ता. चोपडा), लखन ऊर्फ टारझन सुरेश बारेला (२२ रा. मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी दुचाकी चोरट्याना पकडण्याच्या सूचना केल्या होत्या. चोपडा येथे घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते.
पथक चोपड्यात असताना किसन नजनपाटील यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित गणेश बारेला हा कर्जाणा येथे असून, तो चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच पथक कर्जाणा येथे रवाना केले आणि दोघांना अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम