बोदवड येथे अवैध दारूभट्टी उध्वस्थ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | बोदवड येथे एका शेत लगत अवैध गवत दारू तयार करून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाई करून १० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला.

बोदवड पोलिसांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास धाड टाकून २ ड्रम कच्चे व गरम ४०० लिटर रसायन चालू भट्टी व ६९ लिटर तयार हात भट्टी वरील तयार दारूसह १० हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. ही दारू पाडणारा संतोष लालजी मोरे (वय ५२ रा. भिलवाडा, बोदवड) हा पोलीस येण्याचा सुगावा लागताच फरार झाला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम६५ ब,क, फ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गावठी दारू बाबत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असून बोदवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव,हे.कॉ .वसंत निकम ,हे.कॉ. संतोष चौधरी पो.ना. तुषार इंगळे ,पो.कॉ.दीपक पाटील ,मुकेश पाटील यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पुढील तपास पो. ना. युनूस तडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like