रूईखेडा येथील बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त !
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | पोल्ट्री फार्ममध्ये बनाव मद्य निर्मितीचा कारखाना सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यावरून त्यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे धाड टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
राज्य उत्पादन शुल्क हत्याला माहिती मिळाल्यावर मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेडा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये पथक तयार करून मध्यरात्रीच्या सुमारास येथे धाड टाकण्यात आली.
या धाडीत देशी आणि विदेशी मद्य बनावट रासायनिक द्रव्य वापरून तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. बनावट मद्य तयार करून याला बाटल्यांमध्ये भरून यावर विविध कंपन्यांचे लेबल लाऊन विकले जात असल्याचे दिसून आले. या कारवाईत बनावट दारू तयार करणारे रसायन आणि अन्य सामग्री असा लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे भुसावळ येथील निरिक्षक सुजीत कपाटे यांनी बोलतांना सांगितले .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम