निभोरी येथे किराणा दुकान फोडले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ |पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु” येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कृणाल किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने कटरने तोडून आत प्रवेशकरून दुकानातील प्रिंटर, तीन तेलाचे डबे, तिन पिशव्या, चार्जरसह विविध किराणा माल चोरुन अज्ञात चोरटयांनी पलायन केले. या घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकान मालक विकास परमेश्वर शेळके यांचे निभोंरी बु” गावातील कृणाल किराणा दुकान असून ते मंगळवारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. विकास शेळके हे आज २३ रोजी बुधवारी सकाळी ६.४५ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदरचा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात चोरट्याने कटरने दुकानाचे शटर तोडून विविध वस्तू व किराणा मालाची चोरी करून ड्रावरमधील रोख २ हजार ५०० रुपये चोरी करून पसार झाले. शेळके यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like