धावत्या रेल्वेत पाय घसरून पडल्याने युपीचा युवक जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | प्रयागराजहुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानका दरम्यान घडली . घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गुलशन कुमार (वय – २५) रा. मु. शारदा प्रसाद, नुरपुर कासापुर, पो. छीतपालगढ, ता. प्रतापगड (उत्तर प्रदेश) सये मयताचे नाव आहे. गुलशन हा आपल्या १३ वर्षीय भावाला मुंबई दाखविण्यासाठी प्रयागराज येथुन पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये बसला होता. पाटलीपुत्र एक्सप्रेसने पाचोरा स्टेशनस क्रॉस केल्यानंतर काही अंतरावरच गुलशन कुमार याचा पाय घसरला व गुलशान कुमार हा खाली पडला. सदरचा प्रकार त्याच्या भावाने बघताच प्रवाशांच्या मदतीने आपात्कालीन चैन ओढण्यात आली. भरधाव वेगाने धावणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस चैन ओढल्याने थांबल्यानंतर गुलशन कुमार याचा भाऊ एक्सप्रेस मधुन उतरुन घटनास्थळी धावत गेला असता तो मृत झाला होता.

 

गुलशन कुमार हा अप लाईनच्या रेल्वे रुळानजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७०/२०/२२ दरम्यान मृत अवस्थेत आढळुन येताच चिमुकल्या भावाने एकच आक्रोश केला. या घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला कळताच रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांचेसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मयत गुलशन कुमार याचे डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

 

घटनास्थळाचा पंचनामा करून मयत गुलशन कुमार याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like