भुसावळच्या तहसील कार्यालयातून ट्रक चोरला
खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | भुसावळ तहसील कार्यालयात खडीने भरलेला जप्त केलेला ट्रक परवानगी न घेता चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात (एमएच ०१ झेड ६३६३) हा ट्रक अवैधरित्या खडी भरून वाहतूक करत असताना भुसावळ महसूल विभागाने कारवाई करत ट्रक जप्त करून भुसावळ तहसील कार्यालयात लावण्यात आला होता. दरम्यान २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते २१ नोव्हेंबर सकाळी १० वाजता दरम्यान तहसील कार्यालयात लावलेला ट्रक संशयित आरोपी मनोज सुरेश भागवत रा. साकेगाव ता. भुसावळ याने तहसील कार्यालयातून चोरून घेऊन गेला. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मनोज भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम