चाळीसगावात बंद घर फोडले ; ७३ हजारांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | कोणार्क सोनाई नगरातील किरणा दुकानदाराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे चांदीचे व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना चाळीसगाव शहरात उघडकीस आली असून याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा महादू जाधव (वय-52) रा. तेजस कोणार्क सोनई नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कृष्णा जाधव यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like