पैसे मागण्याच्या कारणावरून एकास बेदम झोडपले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ नोव्हेंबर २०२२ | पैसे मागण्याच्या कारणावरून एका 58 वर्षीय मजुराला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदाम मारहाण करून गंभीर दुखापत झाल्याची घटना सुप्रीम कॉलनीत घडली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , गोपाल राजाराम सपकाळे (वय- 58, रा.सुप्रीम कॉलनी, श्रीकृष्ण नगर जळगाव) हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेचच्या सुमारास सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) हा त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडे पैसे मागू लागला. यावेळी गोपाल सपकाळे यांनी पैसे देण्यास नकार दिला, याचा राग आल्याने सोन्याने त्याच्या हातातिल लाकडी दांडक्याने सपकळे यांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत त्यांच्या छातीला व हाताला गंभीर जखम झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात दुपारी 4 वाजता गोपाल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सोन्या (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो हे कॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like