यावल गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात जागीच ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २३ नोव्हेंबर २०२२ | यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज बुधवार दि.23 नोव्हेंबर 22 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शासकीय गाडीने यावल येथून नाशिक येथे शासकीय गाडी एम.एच.19-डी. व्ही.4199 या गाडीने कामासाठी जात असताना अमळनेर तालुक्यातील बोहरा फाट्याजवळ पावणे सहा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. तर गाडीवरील ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली.

भरधाव वेगात असलेल्या गाडीने उभ्या ट्रकला ठोस दिल्याने तसेच गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे क्लीनर साईडला बसलेले होते त्याबाजूने गाडी ट्रकवर आदळली गेली त्यात ते जागीच गतप्राण झाले. एकनाथ चौधरी यांच्याकडे अमळनेर पंचायत समितीच्या कार्यभार सांभाळून यावल पंचायत समितीच्या प्रभारी कार्यभार सांभाळीत होते. मीत भाषी व नेहमी कामाशी काम ही वृत्ती ठेवणारा एक चांगला अधिकारी अपघातातून निघून गेला. एक महिन्यातच यावल पंचायत समितीतील सर्व बहुतेक काम त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळलेली होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like