चार गावठी पिस्तूल , १० जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | गावठी चार पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे चोपडा शहरातून घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक केल्याची घटना १३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली .
शिर्डी येथील काही व्यक्ती हे मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इरादाने खासगी वाहनातून चोपडा शहरातून बाहेर जात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानुसार रविवारी १३ नोव्हेंबर रोजी पथक तयार करण्यात आले. यात पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोहेकॉ सुनील दामोदर, महेश महाजन, पो.ना. रवींद्र पाटील] परेश महाजन, दीपककुमार शिंदे, चालक मुरलीधर बारी यांच्या पथकाने चोपडा शहरातील शिवाजी चौकात सापळा रचुन येणाऱ्या वाहनांची रात्री ११ वाजता तपासणी केली. यामध्ये (एमएच १९ डीएम ७७७८) हे वाहन तपासणी केली असता वाहनाच्या पायदानाखाली ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतूसे आढळून आले. आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय-३२) आणि गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय-२३) दोघी रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतूसे, ३ मोबाईल आणि १ हुंडाई कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम