पाचोऱ्यात दुकान जळून खाक ; १० लाखांचे नुकसान
खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | दुकाना आग लागून यात फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना पाचोरा शहरातील सु.भा.पाटील कॉम्प्लेक्समध्ये रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली या आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले.
सु. भा. पाटील काॅम्प्लेक्स मध्ये महिलां शृंगारासाठी लागणाऱ्या साहित्यांचे “दुल्हन एम्पोरियम” नामक दुकान आहे. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास दुल्हन एम्पोरियम या दुकानातुन धुर निघत असल्याचे तेथुन जाणारे दिनेश जैन यांनी दुकानाचे चालक पिंकी राहुल जैन यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविले असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले होते. या आगीत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुल्हन एम्पोरियमचे प्रो. प्रा. पिंकी राहुल जैन यांनी वर्तवला आहे. सुदैवाने या आगीत जिवितहानी झाली नसुन शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम