चाळीसगावात घरफोडी साडे अकरा लाखांचा मुद्देमाल लंपास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शहरातील शास्त्री नगरात घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तात्रय मालपूरे (वय-५२) रा. शास्त्री नगर, योगेश कॉलनी,हे शिक्षक असून खासगी शाळेत ते नोकरीला आले. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. ते घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. दत्तात्रय मालपुरे यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आव्हाड करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like