तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I रामेश्वर कॉलनीतील प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३६) तरूणाचा अनैतिक संबंधाच्या संशयातून निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे निर्घृण खून करून फरार झालेल्या दोघा संशयितांना सोमवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उमाळा शिवारातून एमआयडीसी पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्यराज नितीन गायकवाड (वय-२६) रा. गणेश नगर आणि सुनिल लियामतखाँ तडवी (वय-२६) रा. तांबापूरा, जळगाव असे दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे.

अधिक माहिती अशी की, प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी हा आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. गेल्या आठ वर्षांपासून विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सफाई कर्मचारी म्हणून नोकरीला होता. अनैतिक संबंधाच्या संशयातून त्याचा सत्यराज गायकवाड आणि सुनिल तडवी यांनी संगनमताने प्रमोद सुरेश शेट्टी यांचा शनिवारी १० डिसेंबर रोजी रात्री निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे निर्घृण हत्या केली. यात तिक्ष्ण हत्यार आणि दगडाने त्याचा ठार केले. दुसरीकडे प्रमोद घरी आला नाही म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याची हरविल्याची नोंद करण्यात आली. सोमवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रमोदचा मृतदेह निमखेडी शिवारातील गिरणानदीच्या काठावरील महादेव मंदीराच्या मागे आढळून आला. याप्रसंगी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. मयतांच्या नातेवाईकांकडून एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपींची माहिती घेतली. एमआयडीसी पोलीसांनी उमाळा शिवारातून खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, हेमंत कळसकर, छगन तायडे, सचिन पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, योगेश बारी, गोविंदा पाटील यांनी सापळा रचून दोन्ही संशयित आरोपींना उमाळा शिवारातून अटक केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like