रामेश्वर येथे शेतकऱयांची गुरे चोरली
खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील रामेश्वर खुर्द या गावातील खळवाडीतून तीन शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकूण पाच जनावरांची चोरी झाली असून याप्रकरणी मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील शेतकरी यशवंत हिम्मत पाटील वय 60 हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच त्यांच्या गावात राहणारे राजेंद्र पाटील आणि संदीप पाटील हे देखील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ११ डिसेंबर रोजी रात्री ११ ते १२ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान त्यांच्या गावातील खळवाडीतून यशवंत पाटील यांचे तीन जनावरे तर राजेंद्र पाटील व संदीप पाटील यांची प्रत्येकी एक पशुधन असे एकूण ५ पशुधनांची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम