६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : जळगाव केंद्राचा सविस्तर निकाल
खान्देश लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडा बु।। या संस्थेच्या अर्यमा उवाच या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले असून, या नाटकाची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- इंदाई फाऊंडेशन, बदरखे, ता.पाचोरा या संस्थेच्या राशोमान या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि कै. शंकररावजी काळुंखे चॅरिटेबल ट्रस्ट, जळगाव या संस्थेच्या मुसक्या या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक विशाल जाधव (नाटक – अर्यमा उवाच), द्वितीय पारितोषिक रमेश भोळे (नाटक- राशोमान), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिषेक कासार (नाटक-मडवॉक), द्वितीय पारितोषिक रमेश लिला (नाटक- राशोमान), नेपथ्य : प्रथम पारितोषिक पियुष बडगुजर (नाटक-मडवॉक), द्वितीय पारितोषिक रविकुमार परदेशी (नाटक- अर्यमा उवाच), रंगभूषा : प्रथम पारितोषिक योगेश लांबोळे (नाटक – अर्यमा उवाच), द्वितीय पारितोषिक सोनल राठोड (नाटक- राशोमन) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक – वैभव मावळे (नाटक-मडवॉक) व मोक्षदा लोखंडे (नाटक- अर्यमा उवाच), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे – गायत्री ठाकूर (नाटक – एक रोझ), तेजसा सावळे (नाटक – मडवॉक), निवेदिता वागळे (नाटक- सुखांशी भांडतो आम्ही), मंजुषा भिडे (नाटक – मुसक्या), प्रतिक्षा झांबरे (नाटक – अजूनही चांदरात आहे), , पंकज वागळे (नाटक – सुखांशी भांडतो आम्ही), अमोल ठाकूर (नाटक- मुसक्या), दिपक भट ( नाटक- राशोमान ), चंद्रकांत चौधरी (नाटक – काय डेंजर वारा सुटलाय ), गणेश सोनार (नाटक – पुन्हा सलवा जुडूम).
दि. २४ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर, २०२२ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रभाकर दुपारे (नागपूर), गजानन कराळे (मुंबई), अर्चना कुबेर (पुणे) यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम