जळगावात तरुणाला मारहाण ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ Iरामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरू घरी जात असलेल्या तरूणाला काहीही कारण नसतांना एकाने दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत मारहाण केली. व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, वैभव अधिक पाटील (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वैभव हा कामावरून घरी पायी जात असतांना अजय विसावे याने काहीही कारण नसतांना वैभवला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर वैभव पाटील याने मध्यरात्री १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अजय विसावे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like