पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली २५ हजारात फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I जळगाव शहरातील गजानन कॉलनीतील व्यापाऱ्याला पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीने २५ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय सुभाष सांखला वय 47 रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. ८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अभय सांखला हे त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून बँक खात्याला पॅनकार्ड जोडण्याचे सांगितले. त्यानुसार समोरील अज्ञात व्यक्तीने पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अभय सांखला यांच्याकडून मोबाईलवर ओटीपी विचारून त्यांची २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी मंगळवारी सोमवारी १२ डिसेंबर रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like