विद्यार्थिंनींच्या वसतिगृहासाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशिन भेट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिंनींच्या वसतिगृहासाठी रावेर तालुक्यातील वाघोदा येथील चक्रधर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दोन सॅनिटरी नॅपकिन वेंडींग मशिन भेट देण्यात आल्यात.

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने या मशिन वाटपाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील, चक्रधर ज्येष्ठ नागरिक संघाचे सिताराम महाजन, गंभीर महाजन व सुधाकर चौधरी हे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाचा समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांचे संपर्क वाढत असून हे विद्यापीठ सर्व घटकांचे आहे असे नमूद करून विद्यापीठाला सहकार्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. प्रा. एस.टी. इंगळे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. गंभीर महाजन यांनी आपल्या मनोगतात नागरिक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद महाजन यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतल्याचे नमूद केले. यावेळी दर्शना पाटील या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. यापूर्वी धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील शिक्षिका ज्योती राणे यांनी देखील सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशिन विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी भेट दिली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like