पत्नीने पतीवर विळ्याने वार करून केले ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I पती संशय घेत असल्याचा संताप अनावर झाल्याने पत्नीने पतीच्या डोक्यात विळ्याने वार करून त्याला ठार केले. दगडू पुंडलिक सुरवाडे (४५) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंरजी पाचदेवळी, ता. बोदवड येथे ही थरकाप उडवणारी ही घटना घडली. दगडू हा पत्नी आशाबाई (३८), दोन मुली व मुलासह करंजी पाचदेवळी वास्तव्यास होता. दगडू हा सतत दारू पिऊन यायचा आणि पत्नी आशाबाई हिच्यावर संशय घेत शिवीगाळ करायचा. पोलिस स्टेशनच्या वार्षिक तपासणीसाठी वरणगाव येथे आलेले नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जे. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, प्रताप शिकारे यांनी घटनेची माहिती घेतली.

रविवारी रात्री तो कामावरून परतला तो नशेतच बाहेर बसून तो पत्नीस अर्वाच्य शिवीगाळ करीत होता. यातून दोघांमध्ये वाद झाला आणि भांडण विकोपाला गेले. आशाबाईने घरातील विळ्याने पतीच्या डोके आणि डोळ्यावर वार केले. तेवढ्यात अंगणात शेकोटीजवळ बसलेली मुलगी रोशनी ही घरात आली. त्यावेळी आई विळ्याने वडिलांना मारत असल्याचे पाहून ती घाबरली. तिने आईच्या हातातून विळा हिसकावत मदतीसाठी शेजाच्याकडे धाव घेतली. ती परतण्यापूर्वीच आशाबाईने पुन्हा विळा घेऊन पतीवर सपासप वार केले आणि यातच दगडू जागीच ठार झाला.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like