तरुणाच्या खिशातून अडीच हजार काढले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ नोव्हेंबर २०२२ | रिक्षातून प्रवास करीत असलेल्या तिघांनी समाधान जाधव (वय-३४, समता नगर) या तरुणाच्या खिशातून अडीच हजार रुपये लांबविल्याची घटना शनिवारी घडली. रिक्षाचालक प्रवाशाला सोडून पसार झाल्याने याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरतील समता नगरात समाधान जाधव हे स्कुल व्हॅन चालक आहेत. समाधान याने रिक्षाचा (एम.एच.१९ व्ही.६५९२) हा नंबर लिहून ठेवला. रिक्षात बसलेल्या तिघांनी हातसफाई करीत समाधान याच्या एका खिशातील एक हजार तर दुसर्‍या खिशातील दीड हजार व आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स अशा वस्तू असलेले पाकीट लांबविले. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like