तूर ,मक्याच्या शेतात गांजा शेती ;६१ लाखांचा गांजा जप्त

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | तूर ,मक्याच्या शेतात गांजा शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गांजा शेतीवर शुक्रवारी कारवाई करून ६१लाख २५ हजारांचा गांजा जप्त केला . मेरसिंह खरते (खरगोन, ता.मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील खडकेसीम येथील डिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या खडकेसीत शेत शिवारातील शेत गट क्रमांक १२ मधील तूर पिकाच्या शेतात गांजा शेती केली जात असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. मेरसिंह खरते (खरगोन, ता.मध्यप्रदेश) याच्याविरोधात हवालदार विलास पाटील यांच्या फर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like