जळगावात पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त ; अन्न औषध प्रशासन व पोलीस यांची संयुक्त कारवाई

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | राज्य बंदी असलेल्या गुटखा आणि इतर पानमसाल्याचा अवैध साठा नवीपेठेतील पंकज ट्रेडर्स येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न औषध प्रशासन व पोलीस यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करून गुटखा आणि इतर सुगंधित पानमसाला असा एकूण पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. मात्र विक्रेत्याने पलायन केले .

अन्न व सुरक्षा विभाग जळगाव शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत नवीपेठेतील भीमसिंग मार्केटमधील मे.पंकज ट्रेडरवर गुरुवारी दुपारी धाड टाकून दोन लाख ६२ हजार ३४७ रुपये किंमतीची ईलायची सुपारी, करमचंद पानमसाला, जाफरानी जर्दा, राजनिवास प्लेवर्ड पानमसाला, मिराज सुपर स्वदेशी तंबाखू, पानपराग मसाला, स्वीट सुपारी, नखराली गोल्ड, रजनी गंधा व इतर पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र मारोतराव भरकड (४३, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार विक्रेता भरत बाविस्कर (४०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like