पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहिर
खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय यांचेकडील दिनांक 4 ऑक्टोंबर, 2022 च्या अधिसूचनेव्दारे जळगाव जिल्हयातील पंचायत समित्यांचे सदयस्थितीत लागु असलेल्या सभापती पद आरक्षणांच्या समाप्तीनंतर पुढील उर्वरीत कालावधीकरीता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करावयाचे आहे. सोडत सभा दिनांक 17 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी सभेस उपस्थित राहावे तसेच जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरीकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे त्यांनी सदर ठिकाणी विहित दिनांकास व वेळेस उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (म.प्र.) शुभांगी भारदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम