अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ |अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुक्यातील खेडी खुर्द शिवारातील मराठी शाळेजवळून तालुका पोलीसांनी पकडले असून वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडी खुर्द शिवारातील अवैधरित्या ट्रॅक्टरच्या मदतीने वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्याने पथकाने ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. पंचनामा करून वाहन जप्त करण्यात आले असतांना ट्रॅक्टर चालका वाहन सोडून पसार झाला .
याप्रकरणी पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक दिपक कोळी तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम