उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची गडचिरोली येथे बदली
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ |जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.मुंढे यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून तर जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.
जिल्ह्यात कार्यकाळ पुर्ण झालेल्या आयपीएस दर्जाच्या अधिकार्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली झाली होती. मात्र त्यांना पदस्थापना देण्यात आली नव्हती. त्यांच्या जागी नागपूर लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची नियुक्ती झाली आहे.
दरम्यान, सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी दुपारी शासानाने आयपीएस संवर्गातील अधिकार्यांच्या बदलीचे व पदोन्नतीचे जम्बो गॅझेट प्रसिद्ध केले. यामध्ये जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची मुंबई शहर उपायुक्त पदी तर उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची गडचिरोली अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम