अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | चाळीसगाव तालुक्यातील एका गावात दोन शाळकरी विद्यार्थिनी शौचालयात गेल्या असता एका व्यक्तीने दोघींना गाठले होते. एकीने चावा घेऊन पळ काढला तर दुसरी त्याच्या तावडीत सापडली. नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता तिने देखील पळ काढून स्वतःचा बचाव केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. मेहुणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशाल उर्फ डिगंबर अशोक जाधव (कोळी) वय-२० रा.दहिवद ता.चाळीसगाव असे आरोपीचे नाव आहे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अति. सत्र न्या.बी.एस.महाजन यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गुन्हयाचे काम तपास अधिकारी जे. आर. सातव, सहा. पोलीस मेहुणबारे यांनी गुन्हयाचा तपास काम करुन मे. न्यायालयात दोषारोपपत्र निरीक्षक दाखल केले. सदरचा खटला हा मे. विशेष मे. विशेष पोक्सो न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालला. सदर खटल्याच्या कामी सरकारपक्षातर्फे एकुण ११ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात दोन्ही पिडीता व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणजेच शाळेतील शिक्षक यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहीले. तसेच आरोपीतर्फे ऍड. संदिप पाटील यांनी कामकाज पाहिले व पेहरवी अधिकारी विजय पाटील यांनी सरकारपक्षास सहकार्य केले. मे. न्यायालयाने सरकारपक्षाचा पुरावा व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी यास दोषी धरुन खालील प्रमाणे शिक्षा सुनावली.

अशी आहे शिक्षा
भा.द.वि. कलम ३७६ सह ५११ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महीने सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ अ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व रुपये १,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ आठवडा सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३५४ – ब अन्वये चार वर्षे सश्रम कारावास व रुपये ४,०००/- द्रव्य दंड न भरल्यास ३ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ८ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व रुपये ३,०००/- द्रव्य दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कारावास, बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व रुपये ५,०००/- द्रव्य दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावास.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like