शेंदुर्णी येथे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | खा.सुप्रियाताई सुळे व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शेंदुर्णी येथे सकाळी  राष्टवादी व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

येथील आचार्य गजाननराव गरुड सभागृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत महिलांनी बाजारपेठ दणाणून गेली होती . मोर्चाचे रुपांतर सार्वजनिक वाचनालय चौकात सभेत रुपांतर झाले.यावेळी मा.जि.प.सदस्या सरोजिनी गरुड यांनी मंत्री अब्दुर सत्तार यांच्यावर टीका केली. .

यावेळी राष्ट्रवादी प्रवक्त्या छाया सावळे, पुष्पाबाई बारी, आशा गुजर, न.प.गटनेत्या वृषाली गुजर, नगरसेविका चंद्रभागाबाई धनगर, मोहसीना खाटिक, भावना जैन, कुसुमबाई चौधरी, राधाबाई गुजर, सुनंदा माळी, नसिमबी पिंजारी, सलमाबी पिंजारी, राजश्री गरुड, मीराबाई जोहरे, रेखा अहिरे, माधुरी गरुड, सुभी तडवी, प्रिया शिवपूजे, भारती माळी, विद्या चौधरी, कविता गुरव, विजया गरुड, सोनाली वानखेडे, सविता धनगर, प्रतिभा जोहरे, अर्चना बारी, सुमनबाई भारुडे आदी महिला व राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य संजयदादा गरुड, मा.जि.प.सदस्य सागरमल जैन, मा.प.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ.किरण सूर्यवंशी, जावा शेख, संजय सूर्यवंशी, अशोक बारी, मन्सूर पिंजारी, गजानन धनगर, योगेश गुजर, विजय चौधरी यांचेसह महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like