पाचोरा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसतर्फे आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहिर निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान यांनी एकमुखाने अब्दुल सत्तार यांचा निषेध नोंदवत अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.अशी मागणी करण्यात आली.

यावेळी रा. महिला काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, उपाध्यक्षा प्रा. डॉ. सुनिता मांडोळे, सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षा प्रा. वैशाली बोरकर, युवतींच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, तालुका उपाध्यक्षा नम्रता पाटील, अनिता देवरे, जयश्री हिरे, आशा जोगी, तालुका अध्यक्षा रेखा देवरे, तृतीयपंथी तालुका अध्यक्षा सिमा सायराजान, मुनमुन सिमाजान, शांताबाई सिमाजान, रेणुका सिमाजान, गंगोत्री सिमाजान, नगरसेवक भुषण वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, नितीन तावडे, कार्याध्यक्ष विलास पाटील, वासुदेव महाजन, युवक तालुका अध्यक्ष अभिजित पवार, सागर हिरे, हरिष पाटील, पिंटु भामरे, उत्तम पाटील, अशोक सोन्नी, जय सुतार, ए. बी. अहिरे, ए. जे. महाजन, भगवान मिस्तरी, गौरव वाघ, हमिद शहा, सत्तार पिंजारी, सुदर्शन सोनवणे, निलेश पाटील, प्रदिप वाघ, विनोद पाटील, तेजस पाटील, उत्तम समारे, सलमान सैय्यद, जगदिश पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like