नोकरीचे आमिष दाखवून अडावदच्या एकाची साडेसहा लाखांत फसवणूक
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | भारतीय नौदलात नोकरी लावून देण्यासाठी काची साडेसहा लाखरुपये घेऊन फसवणूक झाल्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील अडावद येथे उघडकीस आला असून याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद येथील शेतकरी विलास विश्वास पाटील (वय ४५) यांनी आपल्या मुलास भारतीय नौदलात नोकरी लावून देण्यासाठी मुंबईतील कांदिवली येथील पुष्पा रवींद्र साळवी व हेमंत रघुनाथ धाळवे यांच्यासह दोन अल्पवयीन संशयित आरोपींनी आमिष दाखवले. त्यानंतर विलास पाटील यांच्या मुलास नोकरी लावून देण्याचे आमिष देत त्यांचाकडून वेळोवेळी ६ लाख ५० हजार घेत त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अडावद पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.ह.शरीफ तडवी पुढील तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम