किरकोळ कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद ; परस्परांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | किरकोळ कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद होऊन परस्परांविरुद्ध गुन्हा भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पहिल्या फिर्यादीत नगरदेवळा येथील ५६ वर्षीय अण्णा सखाराम मोरे हे दि ७ रोजी विठ्ठलवाडी ते मलकापूर बस मधून उतरतांना कंडक्टरचा पाय मोरे यांच्या गुडघ्याला लागला. यातून दोघांमध्ये वाद होऊन कंडक्टरने मोरे यांच्या गळ्यात जबरीने हात टाकत चैन हिसकविण्याचा प्रयत्न्न करून शिवीगाळ करीत अपमान केल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउनि .गणेश वाघमारे तपास करीत आहेत.

दुसऱ्या फिर्यादीत विठ्ठलवाडी ते मलकापूर बस (क्र.एम.एच.१३ सी.यु.८१०७) बस भडगाव बसस्थानकात आल्यावर संशयित आरोपी अण्णा सखाराम मोरे व त्यांचा मुलगा यांना बसमध्ये धक्का लागल्याच्या कारणातून त्यांनी वाद घालायला. सुरुवात केली. तसेच बस वाहक दत्तात्रय गणेश नाथबुवा (वय ३७) यांना शिवीगाळ करीत जबरी मारहाण करून बसच्या खाली उतरवून पाच ते सहा जणांनी मारहाण केली. या मारहाणीत नाथबुवा यांच्या जवळील १३ ते १४ हजार रुपये गहाळ झालेत. याप्रकरणी त्यांनी भडगाव स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अण्णा मोरे, त्यांचा मुलगा आणि इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like