जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तरुणीचा विनयभंग
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी दि. २७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आली होती संशयित आरोपी विजय पाटील याने तरुणीस लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरणी संशयित आरोपी विजय पाटीलसह दोन तरुणांवर पिडीतेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मपोनां अलका शिंदे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम