भारत जोडो यात्रेसाठी पाचोरा तालुक्यातून ५ हजार कार्यकर्ते जाणार
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ |शेगाव येथील विराट सभेसाठी पाचोरा – भडगाव मतदारसंघातुन राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतासाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
शहर व तालुक्यातुन कॉंग्रेस पदाधिकारी यांनी शेगाव येथील विराट सभेच्या नियोजन साठी आज पाचोरा विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार होते. तर भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक अॅड संदीप पाटील उपस्थित होते . जिल्हा सरचिटणीस जमील शेख,सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अजबराव पाटील, सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, आदी उपस्थित होते
बैठकीच्या सुरवातीला तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी भारत जोडो यात्रेचे महत्व समजून सांगितले. शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत बस आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासोबत काही खाजगी वाहने तर काही रेल्वे ने जाणार असून जवळपास पाच हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत ज्यांना एसटी बस हवी असेल त्यांनी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीत सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, उपाध्यक्ष शरीफ खाटीक, अरमान मौलाना,युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, विधानसभा अध्यक्ष शकील शेख, इरफान मनियार, महीला जिल्हा सरचिटणीस कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, इस्माईल तांबोळी अॅड वसिम बागवान परवेज शेख रसुल ,राहुल शिंदे, गणेश पाटील, कल्पेश येवले, धनराज देवरे, रवी सुरवाडे, आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम