जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत २० जणांचे अर्ज
खान्देश लाईव्ह | ८ नोव्हेंबर २०२२ | जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे,पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह एकूण २० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
जळगाव जिल्हा दूध संघासाठी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातून वडली येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून, माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी पारोळा तालुक्यातीतून, माजी आमदार स्मिता वाघ यांनी अमळनेर तालुक्यातून, भैरवी पलांडे, मनीषा पाटील यांनी महिला मतदारसंघातून अर्ज दाखल केले आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम