पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दूध संघाच्या निवडणुकीत अर्ज दाखल

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून पालकमंत्र्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाचे सूचक भोकर येथील योगेश लाठी असून अनुमोदक भरत पाटील हे आहेत.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु असून नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी सहकार क्षेत्रात प्रवेश केला नसल्याने आता ते दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रवेश करीत असल्याने हि निवडणूक आता चुशीची आणि एकनाथराव खडसे, ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील या तीन दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनणार आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम