आजचे राशिभविष्य , पहा कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.आज पत्नीने दिलेले सल्ले फारच उपयुक्त ठरणार आहेत.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.आज विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.
मिथुन : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील.
सिंह : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.गृहिणी आज घर आवरायचे मनावर घेतील.
कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.प्रवासात खूपच दगदग होईल.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.वैवाहिक जीवनात जुन्या स्मृतींना उजाळा द्याल.
वृश्चिक : कामाचा ताण व दगदग जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.हौस मौज करण्यावर थोडी मर्यादा येईल
धनू : व्यवसायात वाढ होईल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.जिवलग मित्र आज हिताचेच सल्ले देतील.
मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.नेतेमंडळी अधिकारांचा योग्य वापर करतील.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.खर्चाचे प्रमाण वाढेल.गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा असेल व देवही आज नवसास पावेल.
मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.वाहन चालवताना इतर काही विचार करू नका.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम