रोटरी गोल्डसिटीतर्फे आयोजित महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या…
जळगाव | प्रतिनिधी
महिलांमध्ये उपजतच संघर्षशीलता, सहनशीलता, निर्णयक्षमता आदि गुण असल्यांमुळे आज अर्थ – संरक्षण मंत्रालयापासून सेबीच्या अध्यक्षपदापर्यंत तर राष्ट्रपती पदापासून कोरोनानंतर कुंटुंबाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे असे रोटरी गोल्डसिटीच्या माहिला समिती चेअरमन काजल मेहता यांनी प्रतिपादन केले.
रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे आयोजित महिला गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्ष उमंग मेहता, मानद सचिव डॉ. नीरज अग्रवाल, डॉ. एकता अग्रवाल, चंदर तेजवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शलाका वाघण्णा, श्रद्धा मोहोता, सुरमित छाबरा, विभा कोटेचा, रचना पलोड, स्वाती जैन, निधी अग्रवाल, स्मिता पलोड, पायल बन्सल आदि महिलांचा उद्योग, व्यवसाय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सी.ए. प्रिती मंडोरा, डॉ. अर्चना कोतकर, प्रा. ममता दहाड या मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन व संचालन रोटरी गोल्डसिटीच्या महिला समिती सदस्य मितू मंडोरा, प्रेरणा जैन, अल्पा अग्रवाल, दीप कोठारी, प्रियांका केडिया यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी रोटरी गोल्डसिटीचे सदस्य व पुरस्कारार्थी महिलांचे कुटुंबीय यांची उपस्थिती होती.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम