लवकर खरेदी करा, सोने चांदीत झाली मोठी घसरण 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम हा आतंरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. सोने खरेदीचा प्लॅन बनवीत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने पुन्हा एकदा स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,३००रुपये आहे.किंमत ४७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती.जळगावच्या सुवर्णनगरीत आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने ५८८ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदी ११९८ रुपयांनी स्वस्त झालं आहे.

राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सोने ५५ हजारावर गेले होते. त्यानंतर काही दिवसापासून पुन्हा घसरण होत आहे.चालू आठवड्यात गुरुवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like