राष्ट्रीय युवा जल बिरादरी संस्थेची स्थापना, जळगाव गिरीश पाटील याची निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | जळगाव येथे दिनांक २० मार्च रोजी राष्ट्रीय जलबिरादरी चे अध्यक्ष जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कवठेमहाकाळ संपन्न झालेल्या राष्ट्रीय जलबिरादरी संमेलन ठेवण्यात आले होते. या संमेलनात देशातील जलबिरादरी संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या समावेश होता. सोबतच सर्वसंमतीने राष्ट्रीय युवा जलबिरादरी ची स्थापना सुद्धा यावेळी करण्यात आली.

दरम्यान संस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय संयोजकपदी जळगाव येथील योगी ऑर्गनायझेशन फोर ग्रीन इंडिया चे संस्थापक गिरीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गिरीश हा खुद्द जळगाव जिल्ह्यातील वाघ धुळे येथील रहिवासी असून योगी संस्थेमार्फत ग्रामीण विकास व पर्यावरणीय प्रश्नांसाठी तो काम करतो. तो सध्या फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे तो शिक्षण घेत आहे.यासोबतच राष्ट्रीय संयोजन समितीचे मध्यप्रदेशचे पारस सिंह, महाराष्ट्राचे अंकुश नारायणगावकर, आसामच्या जुबी सहा , व तेलंगणाच्या नर्मदा यांची देखील निवड करण्यात आली आहे.

रामन मॅगसेस से प्राप्त राजेंद्रसिंह याच्या प्रेरणेने ही युवा जलबिरादरी देशभरातील युवकांना नदीच्या संवर्धनाच्या आणि पर्यावरण संरक्षणाच्या चळवळ जोडण्याचे काम करते याच बैठकीत जुलै महिन्याच्या शेवटी पुणे येथे राष्ट्रीय युवा जल संमेलन होणार असल्याची लेखी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय युवा जलबिरादरी ची स्थापना करण्यात आली त्या दरम्यान महाराष्ट्र जलबिरादरीचे संस्थापक नरेंद्र चौक, विनोद बोधनकर, डॉ. स्नेहल धोंडे ,डॉ. सुमित पांडे व तेलंगणा जल बोरसे, अध्यक्ष प्रकाश राव, सोबतच कर्नाटक वाल्मी संचालक डॉ. राजेंद्र पोद्दार तथा इतर जलबिरादरीचे आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like