तांबापुरा परिसरात १८ वर्षाच्या तरुणाने घेतला गळफास

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ मार्च २०२२ | जळगाव येथे २१ मार्च २०२२ रोजी घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षरशःकाळीज पिळवटून टाकणारी ही घटना जळगाव येथे घडली. हा तरुणाईच्या नातेवाईकांकडे दाव्याच्या कार्यक्रमाला गेला होता. मात्र असे काय घडले की या अठरा वर्षाच्या तरुणाने गळफास लावून आपला जीव गमावला. ही धक्कादायक घटना जळगाव येथील तांबापुरा परिसरात थोडा काही तासातच उघडकीस आली.

जगदीश सुखदेव कोडपे असे या तरुणाचे नाव आहे. हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक असल्यामुळे त्याच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने आईचा जीव अगदी कासावीस झाला. तिच्या आईला मुळातच जगदीश याचा बराच आधार होता, काही वर्षांपूर्वी जगदीश यांच्या वडिलांचे निधन झाले असून त्याची आई मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जगदीश सुरत रेल्वे मालधक्क्यावर हमाली देखील करत होता.

घडले असे की, शनिवारी दि.१९ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी तो कामाला गेला, काम आहे कामाच्या ठिकाणी कोणी नसल्याने तो घरी निघून आला त्यानंतर दुपारच्या सुमारास घरात कोणीच नसल्याचे जगदीश त्याने पाहिले व दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

त्या दिवशी दुपारी जगदीश ला बघण्यासाठी त्याचे मामा भरत हटकर त्यांच्या घरी आले होते मात्र त्या दरम्यान जगदीश ने आपला पूर्णतः जीव गमावला होता. त्यांना आपल्या भाच्याचे गळफास दिसून आल्यास त्यांनी त्वरित घराचा दरवाजा फोडला व त्याला बाहेर शासकीय रुग्णालयात दाखल केले. व या तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आपल्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने त्याची आई संगीता हिने एकच हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी आहे त्यात त्या दोघांनाही तितकाच जगदीशच्या जाण्याने धक्का बसला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like