आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | – ( शुभ रंग- मरून) सामाजिक पत प्रतिष्ठा वाढेल, आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील. आज जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. व्यवसायात मर्यादित धाडस करायला हरकत नाही.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांना प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्वगुणांना वाव मिळेल.

मिथुन (शुभ रंग- पांढरा)

व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. दैव आज तुमच्या बाजूने आहे. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क ( शुभ रंग -गुलाबी)

वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरू नका. सासुरवाडी कडून आज काहीतरी लाभ संभवतो. गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

इतरांच्या भानगडीत न डोकावता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ज्यात आपल्याला काही कळत नाही त्यात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्यास कमीपणा वाटण्याची गरज नाही.

कन्या (शुभ रंग -चंदेरी)

कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. तुमच्यातील सकारात्मकतेने तुम्ही आज इतरांना प्रभावित कराल. आज ऑफिसमध्ये वरिष्ठांचे व घरी पत्नीचे मुड सांभाळाल.

तूळ ( शुभ रंग – राखाडी)

नकारात्मक विचारांना पळवून लावाल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. देण्याघेण्याचे व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा.

वृश्चिक ( शुभ रंग- निळा )

कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या वेळीच पूर्ण कराल. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. ज्येष्ठांना मुलांकडून काही सुवार्ता येतील.

धनु (शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकामटेकड्या गप्पा मारण्या पेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्य क्षेत्रामध्ये अग्रेसर राहू शकाल. गृहिणींना सासुबाईं कडून कौतुकाचे चार शब्द ऐकता येतील.

मकर ( शुभ रंग- आकाशी)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल, त्यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. पारिवारिक सौख्यात वृद्धीच होईल. आज बेकायदेशीर व्यवहार मात्र टाळा.

कुंभ ( शुभ रंग – मोरपंखी)

तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. झटपट लाभाच्या मोहातून मात्र फसवणूक होऊ शकेल सतर्क राहा.

मीन – (शुभारंभ- भगवा)

आपल्या लहरी व हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमची मते सगळ्यांनाच पटणार नाहीत. कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहावे लागेल. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like