निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणार वाढ

बातमी शेअर करा

युद्धाचे परिणाम हळूहळू जगातल्या सर्वच देशात दिसू लागले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत. पण याचा परिणाम भारतीय बाजारात झाल्याचं दिसत नाही. भारतात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

 

पण सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

 

युक्रेन-रशियाचे संकट अधिक गडद झाल्यामुळे पुरवठा आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. निवडणुकीमुळे किंमत वाढली नाही असे म्हटले जात आहे.

 

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :

 

मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर 94.14 रुपये प्रति लिटर

ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर 94.28 रुपये प्रति लिटर

पुणे 109.72 रुपये प्रति लिटर 92.50 रुपये प्रति लिटर

नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर

नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like