शेतातील गवताला आग शेतमजूराचा संसार जळून खाक
खान्देश लाईव्ह | २ मार्च २०२२ | मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचे चटके जाणवू लागताच आग लागण्याच्या घटना देखील समोर आली आहे. जळगाव विमानतळाच्या पुढे कुसुंबा गावाजवळील एका शेतातील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी घडली.
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या कुसुंबा येथील विमानतळाच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतातील गवताला अचानक आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच अवघ्या २० मिनीटात बंब घटनास्थळी पोहचला आणि ही आग विझविण्यात आली.
शेतालगतच विलास पावरी (बारेला) कुटुंबिय वास्तव्याला आहे. आगी लोळमध्ये कुटुंबिय राहत असलेली झोपडी देखील सापडली. यात एका शेतमजूर कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली आहे. त्यात बारेला कुटुंबियाच्या संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या आहे. महापालिकेच्या बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. अग्निशमन विभागाचे पथकाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आहे.
यासाठी अग्निशमन बंबाचे वाहन चालक वसंत न्हावी, भगवान जाधव, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांनी परिश्रम घेतले. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलीसात नोंद करण्यात आलेली नसून आगीचे कारण देखील समजून आलेले नाही.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम