वाकडी येथे तिघांना बेदम मारहाण
खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याच्या रागातून येथील पती-पत्नीसह मुलाला लोखंडी आसारी व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातील वाकडी येथे मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील वाकडी येथे लक्ष्मण शांताराम पाटील हे मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते घराजवळील खळ्यात म्हशीचे दूध काढत असतांना त्यांच्या पत्नी सुनंदाबाई यांना गावातील गुलाब भारत पाटील, ज्ञानेश्वर भारत पाटील व भारत शांताराम पाटील हे तिघ मारहाण करीत होते. हे पाहून लक्ष्मण पाटील हे त्याठिकाणी गेले. तिघांनी त्यांना धमकी देऊन पोलिसात तक्रार दिली” असल्याचे सांगितले. यावेळी लक्ष्मण पाटील यांना देखील मारहाण करून मुलगा अजयला लोखंडी आसारीसह लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. तिघांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून शांताराम पाटील यांच्या तक्रारीवरुन तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम