धावत्या रेल्वेतून पडल्याने युवक ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | मुंबईहून उत्तरप्रदेशात रेल्वेने जाणाऱ्या युवक रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शिरसोली ते दापोरा दरम्यान घडली असून संतोष घनश्याम राजभर (वय-३५, रा. उत्तप्रदेश) असे मयत युवकाचे नाव आहे. आधारकार्डवरुन तरुणाची ओळख पटली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिरसोली स्टेशनप्रबंधकांनी घटनेबाबत तात्काळ तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, संजय भालेराव, अनिल मोरे, अनिल फेगडे व उमेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार त्याचे कुटुंबिय मुंबई येथून जळगावला येण्यासाठी निघाले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like