मालदीवमध्ये ९ भारतीयांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | मालदीवची राजधानी माले येथे भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९ भारतीयांसह १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे.

ही आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास लागले. मालेमधील भारतीय उच्चायुक्तांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.
मालदीवची राजधानी मालेमध्ये आज गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना आग लागली. या आगीत किमान १० जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मालदीव हे हॉलिडे डेस्टिनेशन म्हणूनही ओळखले जाते. तर जगातील सर्वात दाट वस्तीच्या शहरांपैकी एक आहे. (Maldives Fire)
या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांनी शोक व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत भस्मसात झालेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर १० मृतदेह आढळले आहेत. तळमजल्यावरील गॅरेजमध्ये ही आग लागली होती.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like