एमआयडीसी परिसरात गावठी दारू विकणाऱ्यावर कारवाई
खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | एमआयडीसी परिसरात एका कंपनीसमोर अवैधरित्या गावठी दारू विकणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई दीड हजार रुपयांची ३० लिटर दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
एमआयडीसी परिसरातील व्ही-११२ मध्ये बाणमाता इंडस्ट्रीजसमोरील पटांगणात गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ राहुल रगडे, विजय पाटील व विशाल कोळी यांना कारवाई करण्यासाठी पाठविण्यात आले. कारवाईत १ हजार ५०० रुपयांची ३० लिटीर हातभट्टीची दारु हस्तगत करण्यात आली. तसेच दारु विक्री करणार्या दीपक गंगाराम सोनवणे (वय-४२, रा. वाल्मिकनगर, जैनाबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम