मोबाईलवर संभाषण करणे भोवले ; अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० नोव्हेंबर २०२२ | ट्रकवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना यावल ते चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसरबाग समोर ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. ट्रकचालक राजू गोविंदसिंग उर्फ गब्बर भाई रा. इदलपूर ता. मनिया जि. दौलपूर राजस्थान असे मयताचे नाव आहे.

राजस्थानचा ट्रक क्रमांक (आर जे ११ जी ७३८०) हा ट्रक माल घेऊन यावल ते चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केशर बाग समोरून जात असताना ट्रकचालक राजू गोविंदसिंग उर्फ गब्बर भाई हा मोबाईलवर बोलत ट्रक चालवत होता. रात्री ९ वाजता बोलता बोलता ट्रकच्या स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने भरदार ट्रक एका मोठ्या झाडाला आढळला. या अपघातात ट्रकचालक राजीव गोविंदसिंग उर्फ गब्बर भाई याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. क्लीनर महावीर कन्हैयालाल राजपूत (वय-२८) हा थोडक्यात बचावला . . याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे तपास करीत आहे.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like