मनुदेवी माता मंदिर परिसरातून सामानांची चोरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील नांद्रा रस्त्यावर मनुदेवी मातेचे मंदीराच्या परिसरातून सीसीटीव्हीचे डीव्हीआरसह इतर सामान असा एकूण ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी बुधवार २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कानळदा गावाजवळील नांद्रा रस्त्यावर मनुदेवी मातेचे मंदिर आहे. बुधवारी २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री मंदिराच्या बाजूला असलेल्या मार्बलच्या रॅकमधून सीसीटीव्ही डीव्हीआर व इतर साहित्य असा एकूण ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या संदर्भात लीलाधर अरुण सपकाळे (वय-४२) रा. भवानीनगर, कानळदा ता. जि. जळगाव यांनी बुधवारी २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल तायडे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like