धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I खंडेराव नगरजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने धरणगाव येथील ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रमोद रूपचंद पाटील (वय-४५) रा. पद्मालय नगर, धरणगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
धरणगाव शहरातील पद्मालय नगरात प्रमोद पाटील हे राहतात . गेल्या दोन दिवसांपासून ते त्यांच्या खासगी कामासाठी ते नाशिक येथे गेले होते. गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ते नाशिकहुन जळगाव येथे येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. जळगाव शहरातील खंडेराव नगराजवळ सकाळी ६ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी आणि हरीष डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे मयताची ओळख पटली. खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयतच्या पश्चात पत्नी बबिता आणि मुलगा कृष्णा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like